खान्देशजळगांवशिक्षणसामाजिक

जुमेरा क्लासेसतर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

जळगाव ;- जूमेरा क्लासेस तर्फे ७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वादविवाद स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धाचे आयोजन नदीम मलिक शाळेत करण्यात आले होते याप्रसंगी एकूण २५ लहान बालकांनी यात भाग घेऊन स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व, त्यासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांचे बाबत विचार, स्वातंत्र्य वरील गीते व फॅन्सी ड्रेस च्या माध्यमाने हा उत्सव साजरा केला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी व्यासपीठावर सय्यद चांद, अ. रउफ व फारुख कादरी यांची उपस्थिती होती सहभागी सर्व २५ विद्यार्थ्यांना फारुक शेख यांनी रोख बक्षीस सहित प्रथम तीन विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन गौरविले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी जुनेरा क्लासेसच्या प्रमुख शकीला बानू, जाकीर शेख, रहीस खान,परवेझ शेख, तोफिक खान, उमर शेख, मोहसीन खान, समीना रईस, सबा शेख, सौबिया शेख, अल्फिया शेख व समीर शेख यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शकीला बानू शेख जाकीर यांनी तर सूत्रसंचालन रेहान करीमी व आभार प्रदर्शन जाकीर शेख यांनी केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button