जळगांवगुन्हे

जलतरण मृत्यू प्रकरण : सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा व मृताच्या कुटुंबियास २५ लाख रुपये भरपाई द्या

जळगाव l १९ जून २०२३ l महाराष्ट्र शासनाच्या जळगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल समितीच्या जलतरण तलावात रविवार १८ जून रोजी सलमान बागवान या २३ वर्षे वयाच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्या मृत्यूस जबाबदार असलेल्या संबंधितावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी पोलिसांकडे तर शासनाच्या क्रीडा विभागाने तरुणाच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपये भरपाई द्यावी अशी मागणी क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांच्या कडे करण्यात आली.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा :

प्राथमिक पोस्टमार्टम अहवालात सदर तरुण हा बुडून मृत्यू पावला असल्याची नोंद डॉक्टरांच्या निष्कर्षात आल्याने त्या प्रमाणपत्राच्या आधारे सकाळी १० वाजता बागवान बिरादरी १०० च्या वर तरुणाई सोबत मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारूक शेख यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठून पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांची भेट घेऊन मागणी केली असता त्यांनी तांत्रिक, वस्तुस्थिती माहिती व कागदपत्रे जप्त केल्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल असे आश्वासन दिले.

यावेळी मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख, एम आय एम चे नगरसेवक रियाज बागवान,इकबाल बागवान,वसीम बापू,हाजी अल्लाहबक्ष,अतिक बागवान,इम्रान बागवान, सुफीयान बागवान,अश्फाक बागवान समाजसेवक जिया बागवान,एडवोकेट रहीम पिंजारी, सईद बागवान आदींची उपस्थिती होती.

शासनाने २५ लाख रुपये भरपाई द्यावी :

क्रीडा संकुल समिती ही शासनाच्या क्रीडा विभागा अंतर्गत चालवली जात असल्याने महाराष्ट्र शासनाचे क्रीडामंत्री गिरीश महाजन सह क्रीडा व युवा सेवा संचालनालयाचे आयुक्त, जिल्हा क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना सुद्धा पाच मागण्यांचे निवेदन उपसंचालक क्रीडा व युवा सेवा संचालनालय नाशिक विभाग श्रीमती सुनंदा पाटील व जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांच्या माध्यमाने देण्यात आले.

या निवेदनात एकूण सात मागण्या केल्याअसून त्यात प्रामुख्याने या मृत्यूस जो कोणी जबाबदार असेल त्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात यावा, सदर जलतरण तलाव चालवणाऱ्या संस्थेकडे अधिकृत परवाना व तज्ञ असे लाईफ गार्ड व त्यांची पात्रता प्रमाणपत्र होती का ? ती तपासण्यात यावी.
सदर तरुण हा अत्यंत कमी वयात म्हणजे २३ व्या वर्षी मयत झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर फार मोठा आघात झालेला असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या क्रीडा विभागामार्फत २५ लाख रुपये नुकसान भरपाई अनुदान स्वरूप देण्यात यावी.
शेवटी भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होता कामा नये म्हणून योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्या अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

या निवेदनावर यांची होती स्वाक्षरी व उपस्थिती :

स्विमिंग असोसिएशन ऑफ जळगाव जिल्हा सचिव फारुख शेख, एम आय एम चे नगरसेवक रियाज बागवान ,राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष मजहर खान, राष्ट्रीय काँग्रेसचे महानगर प्रमुख नदीम काझी, ईदगाव व कब्रस्तान ट्रस्टचे सचिव अनिस शाह, ए यु सिकलगर फाउंडेशनचे अध्यक्ष अन्वर खान, वाहिदत इस्लामी चे अध्यक्ष अतिक अहमद यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button