जळगांव

मशिनद्वारे हाडांच्या घनतेचे मोफत तपासणी शिबीर

खान्देश टाईम्स न्यूज l १८ ऑगस्ट २०२३ l वयानुसार आणि खानपानाच्या सवयीनुसार बऱ्याचदा हाडे ठिसूळ होतात. जळगावातील युथ फॉर हेल्प फाऊंडेशन आणि श्री रेणुकाई क्लिनिकतर्फे प्रथमच मशिनद्वारे हाडांच्या घनतेचे मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

मानवी शहरातील हाडांची घनता अनेकदा कमी होत जाते. हाडे ठिसूळ झाल्याने त्रास वाढतात. जळगावात प्रथमच आपली हाडे किती मजबूत आहेत हे तपासण्यासाठी युथ फॉर हेल्प फाऊंडेशन आणि श्री रेणुकाई क्लिनिकतर्फे विनामूल्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरात रुग्णांच्या हाडांची घनता मशिनद्वारे तपासली जाणार आहे. उपक्रमासाठी झंडू फार्माचे सहकार्य लाभत आहे. दि.१९ शनिवार रोजी सकाळी ९ ते २ दरम्यान शिबिर आयोजित करण्यात आले असून त्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे.

प्रथम येणाऱ्या ५० रुग्णांना सवलतीच्या दरात औषधी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. तसेच दि.२० ऑगस्ट ते २० सप्टेंबर दरम्यान महिनाभर वर्षा ऋतू बस्ती व पंचकर्म शिबिर आयोजित करण्यात आले आहे. रुग्णांनी नाव नोंदणीसाठी श्री रेणुकाई क्लिनिक, गट नं. ८०/१/२/ए प्लॉट नं. ६८, आशाबाबा नगर, शिवकॉलनी जवळ, जळगांव याठिकाणी किंवा 7507728959, 9860117189 यावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. शिबिरात डॉ.सारंग जोशी आणि डॉ.रेणुका राजे जोशी हे तपासणी करणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button