स्वातंत्र्य दिनानिमित्त जळगावात ” एक शाम देश के नाम” मुशायरेचे आयोजन
खान्देश टाईम्स न्यूज l १५ ऑगस्ट २०२३ l जळगाव l कविश फाऊंडेशन जळगाव तर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘आझादी का अमृत मेहत्सव’ अंतर्गत ‘एक शाम देश के नाम’ या भव्य मुशायराचे आयोजन इकरा एच.जे. थीम कॉलेज, जळगाव येथे करण्यात आले होते. कविश फाऊंडेशन जळगाव यांचा हा पहिला कार्यक्रम आहे.
सदर सुरुवात मुशायरेचे अध्यक्ष डॉ.अब्दुल करीम सालार यांनी केली होती. या मुशायऱ्यापासुन काविश फाऊंडेशन यांनी आपल्या शैक्षणिक व साहित्यिक सेवेला सुरुवात केली आहे – डॉ.अब्दुल करीम सालार यांनी यावेळी आनंद व्यक्त करत असतांना आयोजकांचे अभिनंदन केले व येथे डॉ. सालार यांनी स्वातंत्र्याच्या खर्या अर्थावर प्रकाश टाकला आणि देशाच्या सद्या परिस्थितीचा आढावा घेतला कार्यक्रमाचे सूत्र संचालन हरून उस्मानी यांनी यशस्वीरीत्या पार पाडले- मुश्ताक साहिल यांनी पवित्र कुरान पठण केले तर असगर भासावली यांनी नाते नबीने उपस्थितांना प्रबोधन केले.
– अब्दुल मजीद झकारिया यांनी मुशायराचे उद्घाटन दिपप्रज्वलन करुन केले – यावेळी निमंत्रित कवींमध्ये साबीर मुस्तफा आबादी, सुंदर मालेगांवी, मुश्ताक अहमद मुश्ताक, जुबेर अली ताबीश, मुश्ताक साहिल, मतीन तालिब, सलीम दर्यापुरी, इम्रान फरीस, इम्रान रशीद.हनीफ आदिल, असगर भासावली, नदीम मिर्झा, फहीम कौसर आणि इम्रान साहिल या नामवंत कवींनी आपल्या कवितांनी रसिकांचे मनोरंजन केले.
या मुशायराचे आयोजक नदीम मिर्झा, फहीम कौसर आणि इम्रान साहिल होते, त्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत या मुशायरेच्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
या मुशायऱ्यामध्ये संपुर्ण जळगांव शहर व परिसरातील साहित्यिक मित्रांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या देशभक्तीचा व साहित्य मैत्रीचा दाखला दिला कावीश फौंडेशन च्या वतीने आभार प्रादर्शन नदीम मिर्झा यांनी केले