
स्व. हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन व माल्यार्पण
जळगाव, प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार व आमदार तथा माजी जिल्हाध्यक्ष स्व. हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
यावेळी आमदार सुरेश भोळे (राजूमामा) आणि भाजपचे ज्येष्ठ नेते उदयजी भालेराव यांनी स्व. हरिभाऊ जावळे यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची तसेच जनसेवेतील योगदानाची माहिती उपस्थितांना दिली. जनसामान्यांशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आणि समाजासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा यावेळी आवर्जून उल्लेख करण्यात आला.
या प्रसंगी भाजप जिल्हा महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, नितीन इंगळे, गटनेते प्रकाश बालानी, नगरसेविका उज्वला बेंडाळे, अरविंद देशमुख, वैशाली पाटील, विजय बांदल, दीपक परदेशी, शक्ती महाजन, प्रकाश पंडित, मयुर भदाणे, संदीप ढंडोरे, महेश चौधरी, महेश कापुरे, माधुरी देशमुख, सरदार तडवी, दत्तात्रय कापुरे आदी उपस्थित होते.
स्व. हरिभाऊ जावळे यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या सामाजिक व राजकीय योगदानाला यावेळी उपस्थितांनी आदरांजली वाहिली.




