खान्देशजळगांवसामाजिक

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या जळगाव जिल्हा विधी सल्लागारपदी अॅड. सलीम इसाक शेख 

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या जळगाव जिल्हा विधी सल्लागारपदी अॅड. सलीम इसाक शेख 

जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या जळगाव जिल्हा कार्यालयाच्या विधी सल्लागारपदी अॅड. सलीम इसाक शेख (जळगाव) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महामंडळाचे जळगाव जिल्हा व्यवस्थापक श्री. पितांबर पाटील यांच्या हस्ते अॅड. सलीम इसाक शेख यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी अॅड. अमजद ए. खान उपस्थित होते.

महामंडळाच्या विविध योजना, अल्पसंख्याक समाजातील लाभार्थ्यांना मिळणारे आर्थिक सहाय्य, कर्जविषयक बाबी तसेच कायदेशीर अडचणींच्या निराकरणासाठी अॅड. सलीम इसाक शेख मार्गदर्शन करणार आहेत.

या नियुक्तीमुळे जळगाव जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजातील नागरिकांना महामंडळाच्या योजनांचा लाभ घेताना उद्भवणाऱ्या कायदेशीर अडचणी सोडविण्यास मदत होणार आहे.

या नियुक्तीबद्दल अॅड. सलीम इसाक शेख (जळगाव) यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button