
पाचोरा येथील ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
जळगाव : पाचोरा येथील पांडव नगरी परिसरातील रहिवासी ज्ञानेश्वर भाऊराव पाटील (वय ६०) यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, आई, एक मुलगा, चार मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. ते टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी किशोर पाटील यांचे सासरे, तर नगरदेवळा येथील पाटील मशिनरीचे संचालक परमेश्वर पाटील यांचे मोठे बंधू होते.
संपर्क : ९२०९९७८०८५




