जळगाव ;- जी. एच. रायसोनी इस्टीट्युट संचालित सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये नुकतीच फायरलेस व थ्री कलर कॉल्ड कुकिंग स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत पालक व विद्यार्थ्यांनी उस्फूर्त सहभाग नोंदवत अनेक सुंदर व पौष्टिक पाककृती सादर केल्या. पाकशास्त्र निपुण प्रियंका बनवट व अपना राका यांनी स्पर्धेत परीक्षण केले. पालकांनी व विध्यार्थ्यानी एकत्रितपणे अनेक चांगल्या रेसिपी यावेळी सादर केल्या.
यात फळे, पालेभाज्या, दूध, बटर, मुरमुरे, बिस्कीट व टॉपिंग्ज अशा नानाविध पदार्थांचा सुरेख वापर करण्यात आला. यावेळी परीक्षाकांनी सर्व स्पर्धकांच्या रेसिपीचे कौतुक केले. यावेळी उपस्थित विध्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करतांना मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी हल्ली जंक फूडचा वाढता प्रभाव आहे परंतु मुलांचे लहान वयात पोषण होण्यासाठी त्यांना चांगला सकस आहार मिळणे गरजेचे असून यासाठी न शिजवताही अनेक पौष्टिक व रुचकर पदार्थ तयार करता येवू शकतात. फळे, फळभाज्या, हिरव्या पालेभाज्या, दूध, डाळिंब, भेळ, सँडविच सारखे पदार्थ मुले आवडीने खातात. अतिशय झटपट आणि तितकेच पौष्टिक असलेले हे पदार्थ मुलांच्या शारीरिक व बौद्धिक विकासासाठी पूरक ठरतात असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
तसेच स्पर्धेत निवड झालेल्या स्पर्धकांचा गौरव करतांना जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ. राजुल रायसोनी म्हणाल्या की सर्व रुचकर पदार्थ तयार करताना पालकांनी अतिशय कल्पकता दाखवली. असे निरनिराळे पदार्थ डब्यात दिले तर मुले ती आनंदाने खातील तसेच हायजीनही चांगले राहिल. अशा स्पर्धेतून सर्वच पालकांना वेगवेगळ्या पौष्टिक रेसिपीची माहिती होते. हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असून सदर स्पर्धा आयोजित केल्याबद्दल त्यांनी . एच. रायसोनी पब्लिक स्कूलचे यावेळी कौतुक केले तसेच या स्पर्धेबद्दल पालकांनी देखील आनंद व्यक्त केला.
हे ठरले स्पर्धेतील विजेते
लहान गट : प्रथम – देवयानी भंगाळे, द्वितीय – प्रयाण जैन
मोठा गट : प्रथम – अनय नाथानी, द्वितीय – जैविक बाफना
सर्वोत्तम सहभाग – आश्वी अग्रवाल, क्रिएटीव्ह शेफ – विरांश मणियार
सर्वोत्तम संघ – विहान तलरेजा