जळगावः एमआयडीसीत मुख्य रस्त्यावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पायी जाणाऱ्या एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी २४ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता घडली आहे.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विकास आत्माराम चौधरी (वय-३४), रा. गारखेडा ता. जामनेर असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
जामनेर तालुक्यातील गारखेडा येथे विकास चौधरी हा तरुण वास्तव्याला होता. तो जळगावातील एका हॉटेलमध्ये नोकरीला होता. रविवारी २४ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घरी पायी जात असताना जळगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या पुढे चौफुली जवळ अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.
या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. त्याच्या खिशातील कागदपत्रामुळे त्याची ओळख पटली. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.