खान्देशगुन्हेजळगांव

तरुणावर जुन्या वादातून प्राणघातक हल्ला

तरुणावर जुन्या वादातून प्राणघातक हल्ला

तीन ते चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल ; शनिपेठ परिसरातील घटनेने खळबळ

खान्देश टाइम्स न्यूज l ८ मार्च २०२५ l जळगाव l शहरातील शनिपेठ पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या शनिपेठ परिसरात येथे 7 मार्च शुक्रवार रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास एका तरुणावर चार ते पाच जणांनी तीक्ष्ण हत्याराने हल्ला चढवून त्याच्यावर वार केल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. यावेळी या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान संवेदनशील परिसर मानल्या जाणाऱ्या शनिपेठ भागात अशा प्रकारे एका तरुणावर प्राण घातक हल्ला झाल्यावरही शनिपेठ पोलिसांनी तातडीने कुठलीही कारवाई न केल्याचे दिसून आले आहे. या घटनेला वीस तासाहून अधिक काळ लोटला तरी अद्याप आरोपी पोलिसांना गवसले नाही. दरम्यान गंभीर जखमी राहुल शिंदे याला एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की राहुल शिंदे आणि त्याचा मित्र आकाश शक्ती सिंह राजपूत हे शनिपेठ भागातून जात असताना जुन्या वादातून संशयित सिंधू निध्यान , निलेश हसकर आणि इतर दोन ते तीन जणांनी येऊन राहुल शिंदे याच्यावर हत्याराने वार करून डोक्याला गंभीर दुखापत करीत जबर जखमी केले. ही घटना रात्री 7 मार्च रोजी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.

रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी :

राहुल शिंदे याच्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला झाल्याची माहिती कळताच शिंदे यांच्या नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात धाव घेऊन गर्दी केली होती.

 

डॉक्टरांकडून टाळाटाळ :

गंभीर जखमी असलेल्या रक्तबंबाळ झालेल्या राहुल शिंदे याला जिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी इथे नाही तर त्या वार्डात घेऊन जा अशी टोलवा, टोलव केल्याने जखमी शिंदेच्या कुटुंबीयांनी रोष व्यक्त केला या वेळी डॉक्टरांसोबत त्यांची बाचाबाची झाली.

शनिपेठ पोलीस स्टेशनचे दोनच कर्मचारी रुग्णालयात :

ज्या ठिकाणी घटना घडली त्या शनि पेठ पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे जिल्हा रुग्णालयात पुरेशी कुमक घेऊन दाखल व्हायला हवे असताना या ठिकाणी केवळ एक पीएसआय आणि एक हवालदार असे दोनच जण रुग्णालयात होते. यावेळी मोठ्या प्रमाणावर जखमीच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी शनिपेठ पोलिसांकडून काळजी म्हणून घटनास्थळ आणि रुग्णालय या ठिकाणी बंदोबस्त ठेवायला हवा होता. मात्र याठिकाणी पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून निष्काळजीपणाचे दर्शन घडले.

दरम्यान शनिपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक हे रजेवर असल्याचे कळते. मात्र हजर असलेल्या मोठ्या अधिकाऱ्यांनी या घटनेकडे गंभीर बाब म्हणून लक्ष देण्याची जबाबदारी असताना सुद्धा हे प्रकरण गांभीर्याने घेतली नसल्याचे चर्चा आहे. तसेच 24 तास उलटून देखील आरोपी अद्याप फरार आहेत.

जखमींच्या नातेवाईकांची धरपकड : 

तरुणावर हल्ला झाल्याच्या घटनेनंतर जखमीच्या नातेवाईकांनी रुग्णालयात जखमेवर त्वरित उपचार करण्याच्या मागणी सह गोंधळ घातल्यामुळे आणि तेथे हजर असलेल्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत शाब्दिक चकमक होऊन गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान डीवायएसपी यांनी रुग्णालयात शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारीसह अधिक पोलिसांची कुमक पाठवून काही जणांना ताब्यात घेऊन परस्तिथी नियंत्रणात आणली असून चौकशी करण्यात आली. तसेच जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान आकाश शक्ती सिंह राजपूत यांच्या तक्रारीवरून शनिपेठ पोलीस स्टेशनला संशयित सिंधू निध्यान, निलेश हसकर आणि आणखी दोन-तीन जणांवर कलम 118(2), 126(2), 296, 352, 351(2) आणि 3(5) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपास सज्जिद माजिद मन्सुरी हे पुढील तपस करीत आहे.

या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिक अधिक सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी करत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button