खान्देशगुन्हेजळगांव

खोटे नाव सांगून तरुणीशी ओळखीनंतर धमकी देऊन अत्याचार

जळगाव : -खोटे नाव सांगून तरुणीशी ओळख निर्माण करीत तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध निर्माण करीत व नंतर त्याचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी अफताब उर्फ अप्पू कलमीस बेग (२३, रा. समतानगर) या तरुणाविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एका भागात राहणारी तरुणी एका नामांकीत महाविद्यालयात इयत्ता अकरावीमध्ये शिक्षण घेत होती. सध्या ती एका महाविद्यालयात अभियांत्रिकीची शिक्षण घेत आहे. इयत्ता अकरावीमध्ये असतानाच तिच्याशी अप्पू याने खोटे नावसां गून ओळख निर्माण केली. त्यांच्यात संवाद वाढत जाऊन त्याचे रुपांतर पुढे प्रेमात झाले. नंतर ते दोघे कॅफेमध्ये सोबत जावू लागले त्या वेळी तरुणाने दोघांचे फोटो मोबाईलमध्ये काढले. त्यानंतर २१ ऑगस्ट २०२१ रोजी तो तरुणीला कोल्हे हिल्स परिसरात मित्राच्या खोलीवर घेऊन गेला व तेथे त्याने शारीरिक संबंधाची मागणी केली. तरुणीने नकार दिला असता तरुणीच्या इच्छेविरुध्द शारीरिक संबंध केले. नंतर पुन्हा मेहरुण तलाव ट्रॅकवर शारीरिक संबंध केले. काही कारणावरून तरुणीने त्याच्याशी बोलणे बंद केले असता तू मला भेटली नाही, माझ्याशी संबंध ठेवले नाही तर आपले सोबतचे फोटो, व्हिडीओ व्हायरल करून तुझ्या घरच्यांना सुध्दा दाखवेल अशी धमकी दिली. त्यामुळे ती त्याच्यासोबत राहू लागली. नंतर त्याने धरणगाव रस्त्यावर जंगलात व त्यानंतरही वेगवेगळ्या ठिकाणी पुन्हा-पुन्हा अत्याचार करणे सुरूच ठेवले. नेहमीच्या बँकमेलिंगमुळे तरुणी आजारी पडली व हा त्रास असह्य झाल्याने या १८ वर्षीय तरुणीने शुक्रवार, २७ ऑक्टोबर रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अफताब उर्फ अप्पू कलमीस बेग याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि गोपाल देशमुख करीत आहेत.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button