खान्देशजळगांवसामाजिक

प्रल्हाद सोनवणे यांची कोळी महासंघाच्या खान्देश संपर्कप्रमुखपदी नियुक्ती

प्रल्हाद सोनवणे यांची कोळी महासंघाच्या खान्देश संपर्कप्रमुखपदी नियुक्ती

माजी आमदार रमेशदादा पाटील आणि युवा प्रदेशाध्यक्ष अॅड. चेतनदादा पाटील यांच्या हस्ते नियुक्तिपत्र प्रदान; जिल्हा व महानगर पदाधिकाऱ्यांच्याही नियुक्त्या

जळगाव, प्रतिनिधी :

आदिवासी कोळी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद सोनवणे यांची कोळी महासंघाच्या खान्देश संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी आमदार रमेशदादा पाटील आणि युवा प्रदेशाध्यक्ष अॅड. चेतनदादा पाटील यांच्या हस्ते १५ नोव्हेंबर रोजी लोणावळा येथे आयोजित राज्यस्तरीय विचारविनिमय बैठकीत त्यांना नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले.

जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळविताना आदिवासी कोळी समाजातील राजकीय पदाधिकारी, सामाजिक क्षेत्रात कार्यरत महिला आणि विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रल्हाद सोनवणे यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. आदिवासी कोळी महासंघाच्या माध्यमातून सामाजिक अधिवेशने, मेळावे, आंदोलने, उपोषणे आणि मोर्चांमध्ये सहभागी होत त्यांनी समाजाचे विविध प्रश्न शासन व प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे.

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शासकीय योजनांचा लाभ समाजातील घटकांना मिळावा, यासाठी ते भाजप अनुसूचित जमाती मोर्चाच्या माध्यमातूनही कार्यरत आहेत. तसेच, रिक्षाचालकांच्या संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही ते काम पाहतात. समाजाची एकजूट, संघटनशक्ती आणि सामाजिक हक्कांसाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर खान्देश संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

जिल्हा व महानगर पदाधिकाऱ्यांच्याही नियुक्त्या

या बैठकीत जळगाव पूर्व जिल्हाध्यक्षपदी हरिलाल कोळी, पश्चिम जिल्हाध्यक्षपदी संदीप कोळी आणि महानगराध्यक्षपदी भगवान सोनवणे यांचीही नियुक्ती करण्यात आली.

बैठकीला कोळी महासंघाचे कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी, सरचिटणीस राजहंस टपके, प्रदेश नेते सतीश धडे, देवानंद भोईर, उपाध्यक्ष प्रा. सुरेश पाटकर, जळगाव जिल्हा प्रभारी जितेंद्र सपकाळे, सिद्धेश्वर कोळी, शानाभाऊ सोनवणे, डी. एम. कोळी, युवराज सैंदाणे, सुभाष सोनवणे, नितीन कांडेलकर, देविदास कोळी आणि बबलू कोळी यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते, विविध संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या नियुक्तीमुळे जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, मालेगाव, भुसावळ आणि अहिल्यानगर परिसरातील कोळी समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरांतून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.

खान्देश विभागात महासंघाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासोबतच समाजातील बंधू-भगिनी आणि युवकांना संघटित करून प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी नव्या जोमाने कार्य केले जाईल, असा विश्वास प्रल्हाद सोनवणे यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button