
रोटरी क्लबच्या असिस्टंट गव्हर्नरपदी अनंत भोळे यांची निवड
जळगाव (प्रतिनिधी) | येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टचे माजी अध्यक्ष अनंत भोळे यांची रोटरी वर्ष २०२७-२८ करीता असिस्टंट गव्हर्नरपदी निवड झाली आहे. नियोजित गव्हर्नर किशोर राठी यांनी आज यासंदर्भात अधिकृत घोषणा केली. ते जळगावातील क्लब आणि डिस्ट्रीक्ट प्रशासन यांच्यात समन्वय साधतील.

अनंत भोळे यांनी यापुर्वी रोटरीमध्ये क्लब सचिव, अध्यक्ष, डिस्ट्रीक्टचे सहाय्यक सचिव, संचालक अशा विविध पदांवर काम केलेले आहे. ते येथील मृदंग इंडिया या जाहिरात संस्थेचे संचालक आहेत.




