खान्देशगुन्हेजळगांव

रथ चौकात अवैध पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह तरुणाला अटक

रथ चौकात अवैध पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह तरुणाला अटक

शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई

जळगाव, प्रतिनिधी : जळगाव शहरातील रथ चौक परिसरात अवैध देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस बाळगणाऱ्या परमेश्वर गजानन बांबर्डे (रा. जुने जळगाव, गोपाळपुरा) याला शनिपेठ पोलिसांनी १८ नोव्हेंबर रोजी अटक केली. त्याच्याकडून पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून, याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रथ चौक परिसरात एक इसम देशी बनावटीचे पिस्तूल बाळगून उभा असल्याची गुप्त माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी रात्रीच्या गस्तीवरील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी रथ चौकात जाऊन संशयित परमेश्वर बांबर्डे याची तपासणी केली असता, त्याच्या कमरेला एक अवैध पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळले. पोलिसांनी दोन्ही वस्तू जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सागर शिंपी, सहायक पोलीस निरीक्षक सुनील कदम, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक संतोष खेडकर, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक अभिषेक कटारे तसेच पोलीस अंमलदार विजय खैरे, योगेश जाधव, अनिल साळुंखे, युवराज कोळी, अजय निकम, नवजित चौधरी, सतीश भारूळे आणि निलेश घुगे यांनी ही कारवाई केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button