जळगाव ;- दोन सामान्य जळगावकरांनी केली एक असामान्य, आवाहनात्मक गोष्ट ती म्हणजे तब्बल १०० वेळा हाफ मॅरेथॉन (२१ किमी रनिंग )पूर्ण केली. हे आहेत भारत पेहवानी (४७वय) आणि होरीलसिंग राजपूत (५३वय). भारत पहवानी यांचे दाणा बाजारात दुकान आहे तर होरिलसिंग राजपूत यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. सकाळी मेहरून तलाव ट्रॅकवर ठिकठिकाणी रांगोळी, ढोलताशे, फुलांचा वर्षाव जणूकाही एक सोहळा आहे असा अनुभव येत होता.
त्यांच्या १००व्या हाफ मॅरेथॉनचा फिनिश लाईनला सोबत होते १०० जळगाव रनर्स ग्रुपचे धावपटू व १०० ओम योग ग्रुपचे सदस्य, यात पिंकेथॉन ग्रुपच्या महिलांचा सहभाग लक्षणिय होता. हाफ मॅरेथॉन पूर्ण केल्यानंतर त्या दोघांचे सपत्नीक सत्कार सुद्धा करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एस.पी.. एम.राजकुमार, डॉ, शेखर रायसोनी,ओम योगा ग्रुपचे डॉ.अभय गुजराथी, जे.आर.जीचे अध्यक्ष किरण बच्छाव,योगशिक्षक सुनील गुरव, जळगाव सायकलिस्टसचे प्रताप पाटील हे सर्व जण होते. हे सर्व जे.आर.जी मुळे शक्य जळगाव रनर्स ग्रुप रनिंग विषयात जळगावात जी जागृतकता निर्माण केली आहे त्यामुळेच आम्ही हे १०० हाफ मॅरेथॉनस पूर्ण करू शकलो व योगाच्या सरावामुळे श्वासावर नियंत्रण ठेवणे शक्य होते.
हे बोलतांना भारत पहवानी अत्यंत भावनिक झाले. “सर्व जळगावकारांसाठी ही अत्यंत अभिमानस्पद गोष्ट आहे,ह्याचा संपूर्ण श्रेय जळगाव रनर्स ग्रुपला जाते.जळगाव मधे रनिंग ट्रेक बनविण्या साठी सर्व मदत करेल,असे एस.पी एम.राजकुमार यांनी सांगितले.” कार्यक्रमाचे सूत्र संचलन डॉ.रवि हिरानी परिचय प्रेम कटारिया आणि आभार विजय कुकरेजा यांनी केले.
विविध संस्था तर्फे सत्कार जळगावातील विविध सामाजिक संस्थातर्फे,अमर शहीद संत कंवरराम ट्रस्ट,कशमोर पंचायत, सेन्ट्रल फुले मार्केट असोसिएशन, हरी ओम वॉकिंग ग्रुप, राजपूत समाजा तर्फे यावेळी दोधांचे सत्कार सुद्धा करण्यात आले.