खान्देशगुन्हेजळगांव

भुसावळात व्यापाऱ्याला मारहाण करून जबरी लूट करणारे जाळ्यात

भुसावळ ;- एका कापड व्यापार्‍याला भुसावळ शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल तनारीकाजवळ अज्ञात तिघांनी कट मारल्याचा बहाणा करून मारहाण करून व्यापार्‍याकडील ३४ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केल्याची घटना मंगळवार, १५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री घडली होती. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शोध पथकाने तीन जणांना अटक केली आहे. संशयिताना न्यायालयात हजर केले असता २२ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

हर्षल संजयकुमार सावकारे (वय-२७, रा.पांडुरंग टॉकीजवळ,), आनंद प्रकाश पवार (वय-२० , कंडारी, ता.भुसावळ) आणि अनिकेत सदानंद सोनवणे (वय-२३  भुसावळ) अशी अटक केलेल्या आरोपी आहे.

किशोर रामेश्वर सदावर्ते (वय-३१ रा. नागपूर) हे कापड व्यापारी असून ते मित्रासह कारने सुरत येथे कपडे खरेदीसाठी गेले होते. परतीच्या प्रवासात कारने दोघे नागपूरकडे निघाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील हॉटेल तनारीकासमोरील उड्डाण पुलावर व्यापार्‍यांच्या चारचाकीला त्रिकूटाने मोपेडद्वारे कट मारला व वाहन अडवत दोघांना मारहाण करीत केली तसेच व्यापार्‍याच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची व ३० हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन व ४ हजार रुपये किंमतीचे व २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे लॉकेट व ५०० रुपये किंमतीची कापडी बॅग (ज्यात एटीएम, आधारकार्ड, लायसन्स होते) संशयितांनी हिसकावून पोबारा केला होता.

पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सुदर्शन वाघमारे, सहाय्यक निरीक्षक हरीष भोये, पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, गुन्हे शोध पथकातील निलेश चौधरी, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, तेजस पारीस्कर, पोहेकॉ प्रशांत परदेशी, योगेश माळी, सचिन चौधरी, जावेद शहा यांनी हि कारवाई केली. तपास सहाय्यक निरीक्षक सुदर्शन वाघमारे, सुदर्शन लाड करीत आहेत.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button