खान्देश टाईम यूज l जळगाव l भडगाव l गोंडगांव येथील ८ वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तरुणाने खून केल्याचे निष्पन्न, झाल्या कारणाने भडगाव येथे तहसीलदार मुकेश हिवाळे,यांना निवेदन देऊन या विकृत बुद्धी अमानुषपणे कृत्य करणाऱ्या नराधमाला फास्टट्रॅक कोर्टात हा खटला चालून सरकारने सरकार तर्फे सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्वल निकम, यांची नियुक्ती करून या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी अशा आशयाचे निवेदन सकल मराठा समाज,मुस्लीम संघटना, यास विविध संघटनांचा तसेच सर्वपक्षीय संघटना यांनी एकत्र येऊन या नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा मिळावी यासाठी भडगाव येथे भडगाव नगरपरिषद येथून लाखोच्या संख्येने एकत्र येऊन शांत पद्धतीने मूक मोर्चाचे आयोजन करून येथून भडगाव तहसील कार्यालय येथे येऊन जळगाव तहसीलदार मुकेश हिवाळे यांना या आठ वर्षीय कल्याणी चिमुकली वर झालेल्या अन्याय अत्याचार विरोधात कथन करून या अत्याचार करणाऱ्या नराधमाला महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये महिला वर होणाऱ्या अन्याय अत्याचार विरोधात निवेदन देऊन या पीडित अल्पवयीन चिमुकलीला न्याय मिळवून द्यावा अशा आशयाचे निवेदन यावेळी देण्यात आले. यावेळी पोलीस प्रशांतर्फे तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. व या ठिकाणी मराठा सकल समाज संघटना तसेच विविध संघटना,सामाजिक संघटना, सर्वपक्षीय संघटना, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी या पीडित चिमुकलीच्या आई-वडिलांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉल करून या पीडित चिमुकलीच्या आई वडिलांशी संपर्क साधत त्यांच्या परिवाराचे सत्वन केले व या चिमुकलीवर अन्याय अत्याचार करणाऱ्या नराधमावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल अशा आशयाचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांनी दिले. यानंतर मोर्चाचे आयोजन कर्त्यांनी या पीडित चिमुकलीला सामूहिक श्रद्धांजली अर्पण करत मोर्च्यात लाखोच्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदायाला आव्हान केले की दिनांक ५ वार शनिवार या पीडित चिमुकलीच्या निषेधार्थ भडगाव शहर तसेच तालुका एक दिवस बंद ठेवण्याचे आव्हान सर्वपक्षीयाकडून करण्यात आले.