
खडसे यांचा दावा मंत्री महाजनांचे महिला IAS अधिकाऱ्याशी संबंध?
गिरीश महाजन यांचं खडसेंना थेट प्रत्युत्तर ; “मी बोललो तर लोक तुम्हाला जोड्याने …
मुंबई (प्रतिनिधी): भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. खडसेंनी गिरीश महाजन यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर आता महाजन यांनीही संतप्त प्रतिक्रिया देत खडसेंना थेट इशारा दिला आहे.
एका व्हिडीओद्वारे एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप करत दावा केला की, “महाजन यांचे एका महिला IAS अधिकाऱ्याशी संबंध आहेत.” त्यांनी असा दावा केला की, “या प्रकरणाची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे असून त्यांच्याकडे संबंधित कॉल रेकॉर्ड्स आहेत.”
खडसे यांनी याच पार्श्वभूमीवर “गगनभेदी” या यूट्यूब चॅनलवरील पत्रकार अनिल थत्ते यांनी सादर केलेल्या क्लिपचा हवाला दिला आहे, ज्यामध्ये संबंधित आरोपांचा उल्लेख आहे.गिरीश महाजन यांनी खडसेंच्या आरोपांचे खंडन करत यावर जोरदार प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले,
“मी जर तुमच्या घरातली एक गोष्ट बाहेर सांगितली, तर लोक तुम्हाला जोड्याने मारतील.”महाजन यांनी खडसेंना खुलं आव्हान दिलं आहे:“एकही पुरावा द्या, मी ताबडतोब राजकारणातून निवृत्त होईन. खोटं बोलताना लाज वाटत नाही का?”तसंच त्यांनी पत्रकार अनिल थत्ते यांच्यावरही निशाणा साधत म्हटलं की, “एका भोंदू पत्रकाराच्या मदतीने खोटं प्रपंच रचला जातोय. माझा अंत पाहू नका. मी बोलायला लागलो, तर खडसेंना तोंड काळं करून बाहेर पडावं लागेल.”
गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय संघर्ष नवीन नाही. मात्र यावेळेस व्यक्तिशः आरोपांमुळे या वादाला गंभीर वळण लागण्याची शक्यता आहे. खडसे यांनी दिलेले आरोप, त्यावरील महाजन यांची कडक प्रतिक्रिया, आणि संभाव्य पुराव्यांची खात्री – या सगळ्यामुळे राज्याच्या राजकारणात नवा वादाचा भडका उडण्याची चिन्हं आहेत.