जळगाव ;- :- तालुक्यातील वसंतवाडी येथे पोहण्यासाठी गेलेले रमेश भिका चव्हाण (४२) हे सोमवारी संध्याकाळी तलावाच्या पाण्यात बुडून बेपत्ता झाले होते. मंगळवारी सकाळपासून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पथक मृतदेह शोधत होते. अखेर तब्बल २२ तासांनी रमेश चव्हाण यांचा मृतदेह सापडला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वसंतवाडी येथे भुलाबाई विसर्जनासाठी काही मुली गेलेल्या होत्या. त्या ठिकाणी रमेश चव्हाण हे तलावामध्ये हे पोहत होते. पोहताना अचानक थकल्यामुळे ते बुडाले आणी बेपत्ता झाले. सोमवारी संध्याकाळी ते मिळून आले नव्हते. रात्री शोध थांबवण्यात आला. सकाळी त्यांचा मृतदेह शोधण्याचे काम आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कडून सुरू करण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.