खान्देशजळगांवशिक्षण

तांबापूरा येथील युनिक उर्दू हायस्कूलच्या शिफा नास लतीफ रवान हिची दहावी परीक्षेत उज्वल कामगिरी

तांबापूरा येथील युनिक उर्दू हायस्कूलच्या शिफा नास लतीफ खान हिची दहावी परीक्षेत उज्वल कामगिरी

८३ टक्के गुण मिळवत शाळा आणि समाजाचा गौरव

जळगाव (प्रतिनिधी) – तांबापूरा येथील युनिक उर्दू हायस्कूलमधील विद्यार्थिनी शिफा नास लतीफ खान हिने दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत ८३ टक्के गुण मिळवले आहेत. तिच्या या यशामुळे शाळेसह संपूर्ण समाजाचा गौरव वाढला आहे.

शिफा ही तांबापूरा झोपडपट्टी भागातील असून अत्यंत साध्या परिस्थितीतून शिक्षण घेत आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर तिने हे यश मिळवले आहे. आर्थिक आणि सामाजिक अडचणींना सामोरे जात असूनही शिफाने शिक्षणात सातत्य ठेवत इतर विद्यार्थ्यांसमोर एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.

या यशाबद्दल तिचे शाळेतील शिक्षक, पालक आणि परिसरातील नागरिकांनी अभिनंदन केले असून, समाजसेवक आसिफ शहा बापू व परिवार, तांबापूरा परिसर यांच्या वतीने विशेष शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. शिफाने आपल्या मेहनतीने केवळ आपलीच नव्हे तर आपल्या शाळेची, परिसराची आणि समाजाची शान वाढवली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button