
गुणवंत पोलीस पाल्यांचा पोलीस अधीक्षकांकडून सत्कार
जळगाव प्रतिनिधी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, यांनी पोलीस विभागामध्ये कार्यरत असणा-या पोलीस पाल्यांचा हस्ते सत्कार समारंभ ठेवुन त्यांचा सत्कार केला,
त्यामध्ये पोलीस उप निरीक्षक सुनिल चौधरी नेमणुक अपर पोलीस अधिक्षक कार्यालय जळगाव यांचा मुलगा विशाल सुनिल चौधरी याने दिनांक २८/०१/२०२५ रोजी लागलेल्या MPSC च्या निकालात त्याने महाराष्ट्र राज्यात ०७ क्रमांक मिळवुन त्याची बहुजन कल्याण अधिकारी (राजपत्रित अधिकारी) वर्ग-ब मध्ये निवड झाली.
छत्रपती संभाजी नगर येथे दिनांक २४/०१/२०२५ ते २७/०१/२०२५ या कालावधीत पार पडलेल्या ६८ व्या राष्ट्रीय शालेय स्पर्धा २०२४-२०२५ १९वर्षे आतील या गटामध्ये सॉप्टबॉल स्पर्धेत शहर वाहतूक शाखा जळगाव येथे नेमणुकीस असलेले पोहवा ज्ञानेश्वर बागुल यांची कन्या सृष्टी बागुल हिने महाराष्ट्र राज्याचे कर्णधार पद भुषवुन संघाला प्रथम क्रमांक मिळवुन देवून सुवर्णपदक देवून तिया गौरव करण्यात आला,
रावेर येथे जिल्हास्तरीय पार पडलेल्या सब ज्यनियर अॅथलेटिक्स निवड स्पर्धमध्ये पोलीस कर्मचारी आमिल शेख यांची मुलगी ईनाया आमिल शेख हिने १० वर्षे आतील मुलीमध्ये ५० मिटर धावण्याच्या स्पर्धमध्ये व्दितीय व स्टेंडींग ब्रॉड जम्पमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच त्यांचा मुलगा अदि आमिल शेख याने ०८ वर्षे आतील मुले यामध्ये ५० मीटर धावणे स्पर्धामध्ये व्दितीय क्रमांक व स्टेंडीग ब्रॉड जम्पमध्ये प्रथम क्रमांक पटकावून त्यांची पंढरपुर येथे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धा २०२५ मध्ये निवड झाली आहे.
मा.पोलीस अधीक्षक सो मा.डॉ.श्री महेश्वर रेड्डी, यांनी गुणवंत पाल्यांचा सत्कार करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.