खान्देशगुन्हेजळगांवसामाजिक

मेरा युवा भारत जळगाव व जळगाव जिल्हा पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नशामुक्त युवा  विकसित भारत संकल्प अभियान

मेरा युवा भारत जळगाव व जळगाव जिल्हा पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नशामुक्त युवा  विकसित भारत संकल्प अभियान

मिशन RISE’ अंतर्गत जनजागृती

भुसावळ, दि. १८ सप्टेंबर २०२६ : मेरा युवा भारत, जळगाव व जळगाव जिल्हा पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने, पोलीस उपविभागीय कार्यालय, भुसावळ आणि श्री संत गाडगे बाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, भुसावळ यांच्या सहकार्याने “नशामुक्त युवा – विकसित भारत संकल्प अभियान” तसेच “मिशन RISE” अंतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस उपविभागीय अधिकारी केदार बारबोले यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी केदार बारबोले यांनी विद्यार्थ्यांना NDPS Act मधील कायदेशीर तरतुदी, अमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांचे गांभीर्य तसेच विद्यार्थ्यांशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले. प्रोबेशनरी डेप्युटी सुपरिटेंडंट ऑफ पोलीस प्रशांत दरेकर यांनी युवकांनी स्वतः नशेपासून दूर राहण्यासोबतच आपल्या मित्रपरिवारालाही व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती दीपाली जगताप यांनी PPT द्वारे विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या अमली पदार्थांची माहिती, त्यांचे शारीरिक व मानसिक परिणाम, NDPS Act मधील तरतुदी, नशेपासून बचाव करण्याच्या उपाययोजना, उपलब्ध हेल्पलाईन तसेच नशामुक्त भारत अभियानात युवकांची भूमिका याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल बारजिभे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नशेपासून दूर राहून शिक्षण, कौशल्यविकास आणि राष्ट्रनिर्मितीमध्ये सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेरा युवा भारत स्वयंसेवक कमलेश सोनावणे यांनी केले, तर मेरा युवा भारत स्वयंसेवक श्री. कृष्णा पुरोहित यांनी विद्यार्थ्यांना नशामुक्तीची शपथ दिली. कार्यक्रमास मेरा युवा भारत, जळगावचे जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चवरे, महाविद्यालयाचे प्रा. गिरीश कुलकर्णी व प्रा. राम अग्रवाल यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून नशामुक्तीची शपथ घेतली. यापैकी १० विद्यार्थ्यांची “ड्रग वॉरियर” म्हणून निवड करण्यात आली असून, हे ड्रग वॉरियर भविष्यात नशामुक्त युवा – विकसित भारत अभियानांतर्गत जनजागृती उपक्रम राबविणे, युवकांमध्ये नशामुक्तीचा संदेश पोहोचविणे तसेच आवश्यकतेनुसार पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे कार्य करतील.
“नशामुक्त युवा – विकसित भारत” या संकल्पनेला बळ देत युवकांनी व्यसनमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी सक्रिय भूमिका बजावावी, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button