
राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिराचा समारोप
जळगाव: ईकरा शिक्षण संस्था संचलित एच. जे. थीम कला व विज्ञान महाविद्यालय, मेहरून, जळगाव यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबिर नशिराबाद येथील उर्दू कन्या शाळा क्रमांक ०१ येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.
समारोपाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अब्दुल करीम सालार होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून नशिराबाद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोरे सर, तसेच ईकरा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. इकबाल शहा, मजीद सेठ जकरिय, प्रभारी प्राचार्य डॉ. चांद खान, केंद्र प्रमुख मसूद शेख, प्राध्यापक डॉ. राजेश भामरे, डॉ. युसूफ पटेल, डॉ. मुस्तकीम बागवान, डॉ. अमीन काझी, डॉ. वकार शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिरातील उपक्रम:
या सात दिवसीय शिबिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी प्रार्थना, चहा-नाश्ता, श्रमदान, दुपारनंतर व्याख्याने, संध्याकाळी खेळ, नमाज पठण, जेवण व सांस्कृतिक कार्यक्रम असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
प्रा. डॉ. तनवीर खान (राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी) यांनी शिबिराचा अहवाल सादर केला. कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठणाने झाली. मसिरा आणि त्यांच्या सहकारी मुलींनी सूत्रसंचालन केले.
स्मृतीदिनी विशेष क्रीडा साहित्य वाटप:
स्वर्गीय कर्नल अब्दुल लतिफ सालार यांच्या स्मृतिनिमित्त डॉ. अब्दुल करीम सालार यांनी नशिराबादमधील सहा शाळांना क्रिकेट किट वाटप केले. तसेच रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत पाच हेल्मेट्स तरुण विद्यार्थ्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोरे सर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
पुरस्कार वितरण:
उत्कृष्ट स्वयंसेवक विद्यार्थी, उत्कृष्ट गट यांना पारितोषिके देण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोरे सर आणि डॉ. इकबाल शहा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषण:
डॉ. अब्दुल करीम सालार यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले, “दुसऱ्यांसाठी जगणे हेच खरे माणुसकीचे उदाहरण आहे. आपण असे माणूस बना की, ज्यामुळे दुसऱ्यांचे भले होईल.”
कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. डॉ. इरफान बशीर यांनी आभार मानले. या शिबिरासाठी डॉ. हाफीज शेख, प्रा. डॉ. कहेकशा, बाबा पटेल, माजुल, आसीफ भाई यांनी विशेष मेहनत घेतली.
राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.