जळगाव शहरातील घटना ; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव प्रतिनिधी ;- रस्त्याने पायी चालणाऱ्या एका २६ वर्षीय महिलेच्या गळ्यातून मोटारसायकलवर आलेल्या एकाने ओढून पळ काढल्याची घटना घडली असून याप्रकणी शनिपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांची दिलेल्या माहितीनुसार सपना भूषण पवार (वय २६, रा. खेडी बुद्रुक, ता. जळगाव) या गुरुवारी ९ जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास शंभरफुटी रस्त्यावरील हॉटेल शामबा पॅलेस समोर रस्त्याने पायी जात असतानाना याचं दुचाकीवरून आलेल्या एकाने त्यान्या गळ्यातून ११ ग्राम वजनाची ५० हजार रुपये किमतीची मंगल पोत लंपास केली . सपना पवार यांनी आरडाओरड केली मात्र उपयोग झाला नाही . या घटनेच्या दुसर्या दिवशी त्यांनी शनिपेठ पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक योगेश ढिकले हे करीत आहे.