जळगाव ;-भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा व महानगर कामगार मोर्चाची संघटनात्मक आढावा बैठक आज दि. २१ ऑगस्ट रोजी वसंत स्मृती भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा कार्यालय इथे कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे याच्या प्रमुख उपस्थितीत व जळगाव जिल्हा महानगरच्या जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. तर या प्रसंगी महानगरा चे माजी जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, अरविंद देशमुख, उदय जी भालेराव, कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजय मोरे, महानगर जिल्हाध्यक्ष कुमार सिरामे, विजय बाविस्कर, मिलीद वाणी, गोविद सैदाणे, अनिल बोरसे, विलास लोहार, राकेश वाघ, किसन मराठे, सुदर्शन पाटील, गणेश माळी, प्रकाश पंडीत, नथूलाल चव्हाण, अरूण धनगर,सुरेश सोनार, सगिता पाटील,नदीनी दर्जी, चित्रा मालपाणी,जगदीश जोशी यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश सोनार यांनी केले त?सर्वाचे आभार गोविद सैदाणे यानी केले.