खान्देशजळगांव

भुंकत असलेल्या कुत्र्याला आवरण्याचे सांगितल्याचा राग  ; मारहाणीत तीन जण जखमी

भुंकत असलेल्या कुत्र्याला आवरण्याचे सांगितल्याचा राग  ; मारहाणीत तीन जण जखमी

जळगाव प्रतिनिधी भुंकत असलेल्या कुत्र्याला आवरण्याचे सांगितल्याचा राग आल्यावरून काठी फरशी आणि दगडाने मारहाण करून यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज शुक्रवारी 17 जानेवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास खेडी शिवारातील विद्यानगर मध्ये घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून या प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव शहरा लगत असणाऱ्या खेडी शिवारातील विद्यानगर येथे सोनी वाणी नामक महिलेचा कुत्रा भुंकत असल्याने आणि तो लहान मुलांवर धाव घेऊन चावा घेण्याच्या प्रयत्नात असल्याने येथील परिसरातील नागरिकांनी त्या महिलेला कुत्र्याला आवरा असे सांगितले होते.

आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास पुन्हा कुत्र्याला आवरा असे सांगितल्याच्या कारणावरून सदर महिलेने पाच सहा जणांना बोलावून गल्लीत उभ्या असलेल्या चंद्रकांत जीवराम चौधरी वय 40, किशोर अर्जुन पाटील वय 42 आणि चेतन लक्ष्मण खडसे वय 35 सर्व रा.  विद्यानगर जळगाव या तिघांना आलेल्या व्यक्तींनी लाकडी दांडका दगड आणि फरशीच्या तुकड्यांनी मारून गंभीर दुखापत केली. तसेच परिसरातील नागरिकांच्या अंगावरही दगडफेक करण्यात आली, घटनेची माहिती कळतच शनिपेठ पोलिसांनी धाव घेऊन तीन अज्ञात व्यक्तींना ताब्यात घेतले असून याबाबत शनिपेठ पोलीस स्टेशनला उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button