इतर

एरंडोल येथील कावड यात्रेचे तीन तरुणांना रामेश्वर येथे जलसमाधी

एरंडोल येथील तीन शिंपी कुटुंबियांवर पहिल्या श्रावण सोमवारी कोसळला दुःखाचा डोंगर

खान्देश टाईम्स न्यूज l २१ ऑगस्ट २०२३ l एरंडोल येथील रामेश्वर येथे कावड यात्रेला गेलेले युवकांपैकी सागर अनिल शिंपी वय 25 वर्ष अक्षय प्रवीण शिंपी वय 21 वर्ष पियुष रवींद्र शिंपी वय वीस वर्ष हे तिघे युवक तापी नदीच्या संगमावर पोहायला गेलेले असता पाण्यात बुडवून त्या तिघांचा मृत्यू झाला ही घटना पहिल्या श्रावण सोमवारी 21 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी तीन साडेतीन वाजेच्या सुमारास घडली हे तिघे युवक एरंडोल येथील भगवा चौक या परिसरातील रहिवाशी असून त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे या घटनेचे वृत्त समजतात तिन्ही शिंपी परिवारात कुटुंबातील सदस्यांनी व नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला परिसरातील दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद केली जवळपास सात आठ वर्षापासून एरंडोल येथून रामेश्वरला कावळ यात्रा नेली जात होती. दुर्दैवाची बाब अशी की तिघे मृत तरुण हे अविवाहित आहेत.

एरंडोल येथील सुमारे दीडशे युवक सोमवारी 21 ऑगस्ट 2023 रोजी भल्या पहाटे भगव्या चौकापासून वाजत गाजत रामेश्वर येथे कावड यात्रेला निघाले सदर यात्रा ही रामेश्वर येथे दोन वाजेच्या सुमारास पोहोचली तिथे पोहोचण्याचा शिंपी कुटुंबियांना भ्रमणध्वनीवरून कॉल सुद्धा आला होता असे कुटुंबीयांनी सांगितले. रामेश्वर येथे संगम स्थळावर कावळड यात्रेतील काही तरुण पोहायला गेले त्यात सागर शिंपी अक्षय शिंपी व पियुष शिंपी या तिघांना पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाला.

विशेष हे की सागर शिंपी हा कुटुंबातील उच्चशिक्षित तरुण असून तो एकुलता एक मुलगा होता त्याच्या अपघाती निधनामुळे कुटुंब निराधार झाले आहे मृत सागरचे आई-वडील हे कामानिमित्त नाशिक येथे गेले असून घरी त्याचे फक्त आजोबा आहेत अक्षय हा बारावी आयटीआय झालेला असून गेल्या सात वर्षांपासून तो विशाल ड्रेसेस हे स्वतःचे दुकान भावासोबत सांभाळत होता. पियुष शिंपी हा देखील बारावी आयटीआय झालेला होता व वडिलांच्या व्यवसायात हातभार लावत होता हे तिन्ही कुटुंब भाऊ बंदकीतले आहेत.

दरम्यान रामेश्वर येथे पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे युवकांच्या मृतदेह शोधण्यासाठी पोलीस प्रशासन व आपत्ती विभागाचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे व पट्टीचे पोहणारे तरुणांकडून शोध मोहीम राबविण्यात येत आहे..
या घटनेमुळे शहरावर शोककळा पसरली असून युवकांच्या अपघाती निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button