इतरखान्देशगुन्हेजळगांव

गावठी कट्टा बाळगून दहशत माजविणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जळगाव प्रतिनिधी :-भडगाव शहरात गावठी पिस्तूल बाळगून दहशत माजविणाऱ्याच्या मुसक्या स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने आवळल्या असून त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश कांबळे असे संशयित आरोपीचे नाव आहे.

भडगाव शहरात गावठी बनावटीचा कट्टा घेऊन दहशत माजवीत असल्याची खबर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाले होते त्यानुसार त्यांनी आज भडगाव राठोड आकाश कांबळे याला अटक केली. त्याच्याकडून अडच चौकशी केली असता त्याने ही पिस्तूल

तालुक्यातील कजगाव येथे राहणाऱ्या शुभम भास्कर दौणे रा. रेल्वे स्टेशन जवळ याच्याकडून घेतल्याचे कबूल केले. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आकाश झुंबर कांबळे, रा. वरची बडी, यशवंत नगर आई मरीमाता मंदिरा जवळ भडगाव, शुभम भास्कर दौणे रा. रेल्वे स्टेशन जवळ कजगाव ता. भडगाव या दोघांना ताब्यात घेवून त्यांचे कडून २५०००/- रु किंमतीचा गावठी बनावटीचा कट्टा (पिस्टल) जप्त करून त्यांचे विरुध्द भडगाव पो.स्टे. CCTNS NO ६/२०२५ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही पोउपनिरी श्री शेखर डोमाळे, पोह प्रविण भालेराव, महेश पाटील, ईश्वर पाटील, सागर पाटील, दिपक चौधरी सर्व नेम. स्थागुशा जळगाव यांनी केली आहे.

सदर गुन्ह्याची कारवाई डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, .श्रीमती कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव,  बबन आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक  स्थागुशा जळगाव यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button