मु.जे.त करीअर कट्टा अंतर्गत विद्यार्थी संवाद
जळगावआयुष्यातली बेलेन्स शिट मांडण्यापासून ते नवनवीन कौशल्य आत्मसात करण्यापर्यंत; आपल्या वेळेचे किंमत ठरवण्यापासून मोबाईलचा सदुपयोग करण्यापर्यंत अशा अनेकविध विषयांची अतिशय सरस पद्धतीने मांडणी करत विद्यार्थ्यांना करिअर विषयी महाराष्ट्र राज्य करिअर कट्टा समन्वयक प्रा. यशवंतराव शितोळे यांनी मार्गदर्शन केले.
औचित्य होते विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे , जळगावच्या सुप्रसिद्ध अश्या मूळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयात करिअर कट्टा या उपक्रमाबद्दल मार्गदर्शन पर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते . महाविद्यालयात तीन विविध सत्रात या व्याख्यानाचे विविध शिक्षण शाखांसाठी आयोजन करण्यात आले होते . वाणिज्य व व्यवस्थापन ,कला, विज्ञान तथा एन . सी . सी . च्या विद्यार्थ्यांशी प्राध्यापक शितोळे यांनी संवाद साधला .प्राध्यापक शितोळे यांनी आजचा विद्यार्थी उद्याचा जबाबदार नागरिक व देशाचे भविष्य आहे. करिअर कट्टा संपूर्ण महाराष्ट्रातील युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. त्यांना महाविद्यालयीन शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, तंत्रशिक्षण, व्यवसाय शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण, व्यावहारिक ज्ञान तसेच संस्कारांनी समृद्ध करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आयुष्याची सुरुवात नियोजनबद्ध करणे आवश्यक आहे. कौशल्य प्राप्तीसाठी प्रामाणिक प्रयत्न असावेत, तसेच चांगली पुस्तके वाचली पाहिजेत. प्रशासकीय अधिकारी, यशस्वी उद्योजक यांच्या भेटी घेऊन यश प्राप्तीसाठी परिश्रम घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. महाविद्यालये प्राचार्य स. ना. भारंबे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले . विद्यापीठाचे विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. जयंत लेकुरवाळे यांनी एका सत्रात विद्यार्थ्यांना संबोधित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री खैरनार यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अथर्व मुंडले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी करीअर संसदेच्या मंत्रिमंडळाच्या व सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले .