माहिती कळविणा-याचे नाव राहणार गोपनीय
जळगाव l २१ जून २०२३ l जिल्हातील अवैध गौणखनिज उत्खनन, वाहतुक रोखणेसाठी जिल्हास्तरीय विविध विभागांचे समन्वयातून पथकांची निर्मिती करणेत आलेली आहे. सर्व आवश्यक उपाययोजना करुन जिल्ह्यातील अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतुक रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्व आवश्यक ते प्रयत्न करणेत येत आहे. अवैध गौणखनिज साठा, उत्खनन व वाहतुकीची माहिती सजग नागरिकांकडुन जिल्हा प्रशासनाला मिळाल्यास अधिक परिणामकारक कारवाई करणे शक्य होईल. जनतेचे अधिकाधिक सहकार्य मिळवून अवैध गौणखनिजाचे साठा, उत्खनन व वाहतुकीवर प्रतिबंध करण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस असल्याचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी कळविले आहे.
सामान्य नागरिकांना अवैध गौणखनिज साठा, उत्खनन व वाहतुकीबाबत माहिती जिल्हा प्रशासनाला कळविणेसाठी नागरिकांना 9209284010 हा हेल्पलाईन क्रमांक जिल्हा प्रशासनाद्वारे उपलब्ध करुन देणेत येत आहे. नागरिकांनी 9209284010 या हेल्पलाईन क्रमांकावर अवैध गौणखनिज साठा, उत्खनन व वाहतुकीबाबत बाबत व्हॉटसअपद्वारे घटनेचे छायाचित्र/चलचित्रफित (फोटो/व्हिडीओ), घटनेचे ठिकाण, गुगल लोकेशन कळविल्यास प्राप्त तक्रारीबाबत जिल्हा प्रशासनाच्या स्तरावरुन तात्काळ कारवाई करणेत येणार आहेत.
अवैध गौणखनिजाबाबत तक्रार करणाऱ्या नागरिकांचे नाव गोपनीय ठेवणेत येईल, तरी नागरिकांनी जिल्हा प्रशासनाच्या उपक्रमाला सहकार्य करणेचे आवाहन करण्याचे आवाहन अमन मित्तल, जिल्हाधिकारी तथा
जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.