राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त 27 ते 29 कालावधीत क्रीडा स्पर्धां; सर्व वयोगटासाठी स्पर्धांचे आयोजन
जळगाव l २४ ऑगस्ट २०२३ l राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी व विविध खेळ संघटनामार्फत 27 ते 29 ऑगस्ट कालावधीत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या क्रीडा स्पर्धा 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता पुरुष व महिलांकरिता स्पर्धा घेण्यात येतील. यात 18 ते 40 वयोगटात -100 मीटर धावणे, योगा, फुटबॉल, बॅडमिटन कॅरम, आर्म रेसलींग, वयोगट 41 ते 60 करिता – 50 मीटर धावणे, 300 मीटर धावणे, 1 कि. मी. चालणे, खो-खो, योगा, कॅरम, चेस बॅडमीटन, अर्म रेसलींग, लंगडी, लिंबु चमचा तसे 60 पेक्षा जास्त असलेल्या वयोगटासाठी – 300 मीटर चालणे, 1 कि मी चालणे, चेस, कॅरम स्पर्धा घेण्यात येईतील. तसेच राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त महसूल विभाग, पोलीस विभाग, वित्त विभाग यांनीही विविध खेळाचे आयोजन करावयाचे आहे. खो-खो स्पर्धा व. वा. वाचनालय, कॅरम व बुध्दिबळ स्पर्धा कांताई हॉल व इतर स्पर्धा श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे होतील.
हॉकी खेळाचे खुल्या गटातील मुले व मुलींचे सामने 29 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 वाजता होणार आहेत. इच्छुक स्पर्धकांनी 25 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजेपर्यन्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव येथे संपर्क साधून आधारकार्डची झेरॉक्स प्रत जोडून आपल्या नावाची नोंदणी करावी. जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गुरुदत्त चव्हाण यांनी केले.