नाशिक विभागीय कराटे स्पर्धेत जळगांव पोलिस स्पोर्ट्स अकॅडमी चे यश
खान्देश टाइम्स न्यूज l जळगाव l दि. २५ ते २७ रोजी धुळे साक्री तालुका पिंपळनेर येथे महाराष्ट्र शासनाच्या शालेय कराटे नाशिक विभागीय स्पर्धा २०२४ यशस्वीरित्या संपन्न झाल्या यात – ५५ किलो वजनी गटात १४ वर्ष आतील खेळाडू कौस्तुभ राजेंद्र जंजाळे, – ३० किलो वजनी गटात १४ वर्षे आतील मुलींमध्ये अवनी निलेश सोनवणे ,६४ किलो वजनी गटात सतरा वर्षा आतील मुलींमध्ये गोरचना योगेश पाटील तर – ७० किलो वजनी गटात १९ वर्षा आतील मुलांमध्ये वेदांत समाधान हिवराळे या तीन खेळाडूंनी जळगाव जिल्ह्याचे नाव राखून यांची पुढे राज्यस्तरीय स्पर्धे मधे निवड झाली आहे स्पर्धा ह्या २८ ते ३० नोव्हेंबर रोजी धुळे जिल्हा क्रीडा संकुल येथे होणार असून खेळाडू या स्पर्धेसाठी २८ तारखेला रवाना होणार आहेत.
या स्पर्धेत यश संपादन केल्यास खेळाडू पुढे राष्ट्रीय स्पर्धेसाठी जातील पुढील स्पर्धे साठी खेळाडूना जलगांव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते,उपविभागीय पोलिस अधिकारी जळगाव संदीप गावित, पोलिस उपअधिक्षक गृह संजय गायकवाड, राखीव पोलिस निरीक्षक प्रशांत सुगरवार, सहायक पोलिस निरीक्षक वेल्फेअर योगिता नारखेडे, पो.उप.निरीक्षक गायकवाड, पप्पू देसले यांनी शुभेच्छा दिल्या तसेच खेळाडूना अश्विनी निकम/जंजाळे, जागृतीकाळे/महाजन, राजेंद्र जंजाळे, प्रथमेश वाघ, स्वप्नील निकम यांचे मार्गदर्शन लाभले.