जळगावातील पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलला
जळगाव : शनिवार रोजी होणारा शहरातील पाणी पुरवठा एक दिवस उशिराने केला जाणार आहे. वाघूर पंपीग व उमाळा जलशुध्दीकरण केंद्र येथील विद्युत पुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.
पाणी पुरवठा विभागा कळविण्यात आले की, वाघूर पंपीग स्टेशन, उमाळा येथील विद्युत पुरवठा महावितरण कंपनीतर्फे दुरुस्तीच्या कामासाठी शनिवारी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. शनिवार रोजी ज्याभागात पाणी पुरवठा होतो, त्या भागात रविवार रोजी पाणी पुरवठा करण्यात येईल. तसेच रविवारी ज्या भागात पाणीu पुरवठा करण्यात येणार होता, तो पुरवठा एक दिवस उशिराने करण्यात येणार आहे. तसेच सोमवारी होणारा पुरवठा मंगळवारी केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे असे अवाहन महापालिका पाणी पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.