जळगाव:- शहरातील गेंदलाल मिल परिसरात असणाऱ्या एका किराणा दुकानातून आज्ञा चोरट्यांनी चार ते पाच ऑक्टोबर च्या दरम्यान रोकड आणि किराणा सामान असा एकूण 23 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत जळगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की कव्हर नगर सिंधी कॉलनी येथे राहणारे वासुदेव टिकमल हानंदी वय 59 यांचे शहरातील गेंदलाल मिल भागात वासुदेव नावाचे किराणा दुकान असून ४ रोजीच्या रात्री नऊ ते ५ रोजीच्या सकाळी सहाच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या किराणा दुकानातून चार हजार दोनशे रुपयांची रोकड रीन साबण, लाईफ सावन ,संतूर साबण, डेटॉल साबण, तूर डाळ कट्टा ,बिस्कीटचे कार्टून ,सोयाबीनचे तेल ,पॅराशुट तेल असे एकूण 22 हजार 490 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेले . याबाबत फिर्याद वासुदेव हानंदी यांनी जळगाव शहर पोलीस स्टेशनला दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध पाच रोजी दुपारी साडेअकरा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस रेकॉर्ड उमेश भांडारकर करीत आहे.