जळगाव;- जळगाव डाक विभागाअंतर्गत जागतिक टपाल दिनानिमित्त ९ ऑक्टोंबर ते १३ ऑक्टोंबर २०२३ या कालावधीत राष्ट्रीय टपाल सप्ताहाचे आयोजन करण्यात आला असल्याची माहिती अधीक्षक डाकघर, जळगाव विभाग, यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
राष्ट्रीय टपाल सप्ताहानिमित्त ९ ऑक्टोंबर ते १३ ऑक्टोंबर २०२३ या कालावधीत पुढील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.
असे आहेत कार्यक्रम
सोमवार, ९ ऑक्टोंबर रोजी सर्व वृत्तपत्र प्रतिनिधींना आमंत्रित करून पोस्टाच्या योजनांची माहिती दिली जाणार आहे.
मंगळवार, १० ऑक्टोबर रोजी सर्व प्रकारचे नवीन खाते लॉगीन दिवस आयोजित करून सर्व नागरिकांना संपूर्ण योजनाची माहिती देऊन जास्तीत जास्त नवीन खाते ओपन करून त्यांना विविध योजनेत सहभागी करून घेतले जाईल. ग्रामीण भागातील नागरिक यांचे करिता शिवणी येथे एस बी मेळावा आयोजित केला आहे. तसेच पोस्ट कार्यालयाचे सर्व स्तरातील खातेदार यान बोलावून त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल.
बुधवार, ११ ऑक्टोबर रोजी सर्व शाळा महाविद्यालयामध्ये FILATALY संबंधी माहिती प्रदर्शन व प्रश्न मंजुषा सर्व विद्यार्थी/विद्यार्थिनींसाठी आयोजित केली जाणार आहे.
गुरुवार, १२ ऑक्टोबर रोजी सर्व नागरिक यांना टपाल वितरण विषयी माहिती देऊन शाळकरी विद्यार्थी यांना पोस्ट कार्यालयात बोलावून सर्व पोस्ट विषयक माहिती सांगितली जाईल.