खान्देशजळगांवशिक्षणसामाजिक

आई-वडिलांच्या कष्टाची जाण ठेवून अभ्यास करा – अमोल गर्जे

पहूर , ता . जामनेर ;- विद्यार्थ्यांनी आपल्या शेतकरी – कष्टकरी आई-वडिलांच्या कष्टाची जाण ठेवून अभ्यास करावा , आजपासून पुढील पाच वर्षे कठोर मेहनत , अभ्यासाचे योग्य नियोजन केल्यास तुमचे भविष्य उज्वल होऊ शकते , असे प्रतिपादन पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे यांनी केले . महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित विशेष व्याख्यानात बोलत होते .

आज शनिवारी शाळेच्या चाणक्य सांस्कृतीक सभागृहात ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार ‘ या विषयावर बोलताना त्यांनी पुढे सांगितले की , स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर आपल्याकडे गुणवत्ता असायला हवी , विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध असून पोलीस दलातही आजपासून नियोजन करून तुम्ही अधिकारी बनू शकतात .तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस , मुलींनी स्वतःच्या क्षमता तपासून विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवायला हवे , असेही ते म्हणाले .प्रारंभी विद्यार्थिनींनी इशस्तवन स्तवन सादर केले . प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रीमती व्ही .व्ही .घोंगडे यांनी केले . यावेळी शाळेतर्फे मान्यवरांचं पुष्पगुच्छ आणि स्नेहवस्त्र देऊन स्वागत करण्यात आले . यावेळी सौ . छायाताई गर्जे , उपमुख्याध्यापिका के . ए . बनकर , ज्येष्ठ शिक्षक बी. एन .जाधव यांच्यासह सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .सूत्रसंचालन वर्ग शिक्षक शंकर भामेरे यांनी केले .आभार क्रीडाशिक्षक हरिभाऊ राऊत यांनी मानले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button