खान्देशगुन्हेजळगांव

मोबाईल लांबविणाऱ्या गुन्हेगाराला अटक ; एमआयडीसी पोलिसांची करवाई

जळगाव ;- दोन जणांना चाकूचा धाक दाखवत दोन महागडे मोबाईल लांबविल्याची घटना शहरातील मेहरूण तलाव परिसरात घडली होती. या गुन्ह्यातील फरार असलेल्या चौथा संशयित आरोपी अमन उर्फ खेकडा रशीद सैय्यद (२०, रा. सुप्रिम कॉलनी) याला शनिवारी १२ ऑगस्ट रोजी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास शाहू नगरातून एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. अमनवर या पूर्वीच १२ गुन्हे दाखल असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, ११ जुलै रोजी रात्री १२ वाजता हिमांशू शशिकांत कुटे (२५, रा.महाबळ) व देवेश संजय चव्हाण हे मेहरुण तलावाजवळ बसले होते. तेथे एका दुचाकीवर (क्र. एम एच १९, डीएम ३२७८) चार अनोळखी इसमांनी येऊन चाकुचा धाक दाखवत २९ हजार रुपये किमतीचा एक व दुसरा १० हजार ५०० रुपये किमतीचा असे एकूण दोन मोबाईल बळजबरी घेऊन गेले होते. या वेळी हिमांशू कुटे यांना पाठीवर व मांडीवर चाकू मारुन गंभीर दुखापतदेखील केली होती. या प्रकरणी १३ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यात यापूर्वी तीन जणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या सोबत असलेला चौथा साथीदार अमन उर्फ खेकडा रशीद सैय्यद हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. तो रेर्काडवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी १२ गुन्हे दाखल असून त्याचा शोध सुरु होता. तो शाहू नगर येथे असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यानुसार शाहूनगर येथून १२ ऑगस्ट रोजी रात्री त्याला सहायक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सैय्यद, सुधीर साळवे, चंद्रकांत पाटील, मुकेश पाटील, मुदस्सर काझी, साईनाथ मुंढे यांनी ताब्यात घेतले. त्यास रविवारी १३ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजेता अटक करुन न्या. सुवर्णा कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता अमनची कारागृहात रवानगी करण्यात आली. तपास पोउनि रवींद्र गिरासे, पोहेकॉ सचिन मुंढे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button