खान्देशजळगांवशिक्षण

अनुभूती निवासी स्कूलचा ‘स्कूल मेरिट अॅवार्ड-२०२३’ ने सन्मान

बोर्डींग स्कूलमध्ये अनुभूती स्कूल महाराष्ट्रातील सर्वात्तम शाळांमध्ये; ‘एज्युकेशन टुडे’चा सर्व्हे

जळगाव;- एज्युकेशन टुडे द्वारा केल्या गेलेल्या सर्वेक्षणातून बोर्डींग स्कूल श्रेणीमध्ये अनुभूती निवासी स्कूलचा महाराष्ट्रातील प्रथम तीन शाळांमध्ये समावेश झाला आहे. मुंबई येथे ललित येथे दि. ४ ला झालेल्या शानदार पुरस्कार सोहळ्याप्रसंगी ‘स्कूल मेरिट अॅवार्ड – २०२३’ ने स्कूलला सन्मानित करण्यात आले. अनुभूती स्कूलच्या वतीने ज्येष्ठ शिक्षक वेणू गोपाल वंगारा यांनी हा पुरस्कार स्विकारला.

“एज्युकेशन टुडे” या प्रतिष्ठीत मासिकाद्वारे १५ निकषांच्या आधारे ही निवड करण्यात आली. त्यामध्ये विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, सर्वांगीण शिक्षण, शैक्षणिक दर्जा, शिक्षकांची प्रगती, सहअभ्यासक्रमात शिक्षण, एकात्मिक ज्ञान, खेळात प्रगती, डिजीटल शिक्षणातील प्रगती, विद्यार्थी विकास व दर्जेदार नेतृत्त्व, भविष्य-संरक्षित शिक्षण सुविधा, पालकांची भावनिक गुंतवणूक, समाजसेवा, मानसिकदृष्ट्या विद्यार्थ्यांची स्थिती ह्यांचा समावेश होता. एज्युकेशन टुडे सर्वेक्षण आणि ज्युरी टीम्सने सुरू केलेल्या विस्तृत रँकिंग सर्वेक्षणाच्या आधारे विविध शाळांना विविध श्रेणींमध्ये पुरस्कार दिले गेले. शिक्षण क्षेत्रात प्रतिष्ठीत असलेल्या एज्युकेन टुडे सर्वेक्षणात अनुभूती निवासी स्कूलला प्रथम तीन मध्ये मानांकित करण्यात आले.

निसर्गाच्या सान्निध्यात शंभर एकर परिसरात विस्तारलेली अनुभूती स्कूल इयत्ता ५ वी ते १२ पर्यंत पूर्ण निवासी आहे. अनुभूतीमध्ये १६ वर्षापासून औपचारिक शिक्षणासोबतच अनुभवाधारित सर्वांगीण विकास आणि भारतीय संस्कृतीचे संस्कारमूल्ये रूजविले जातात. ज्यामुळे स्पर्धायुक्त जगात अनुभूतीचे विद्यार्थी आपली वेगळी छाप सोडत आहे. अनुभूती स्कूलमध्ये १२ वेगवेगळ्या राज्यातून विविध संस्कृतीचे विद्यार्थी व शिक्षक असल्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन इथं घडते. प्रत्येक सहा विद्यार्थांमागे एक शिक्षक असे उत्कृष्ट प्रमाण असल्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता उच्चतम राखली जात आहे.

शैक्षणिक अभ्यासक्रमासह विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी शिक्षकांनी घेतलेली मेहनत, अनुभवाधारित शिक्षण देण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा उपलब्ध करून देण्यासाठी व्यवस्थापनाची तळमळ यामुळेच हे यश प्राप्त करणं शक्य झाल्याचे मत अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन व संचालिका सौ. निशा जैन यांनी व्यक्त केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button