नवी दिल्ली वृत्तसंस्था :– चीनमध्ये ह्यूमन मेटान्यूमोचा प्रादुर्भाव बघायला मिळतो आहे. अशातच भारतातही याचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. बंगळुरूमध्ये आठ महिन्यांच्या चिमुकलीला एचएमपीव्ही विषाणूची लागण झाली आहे.
आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, एका खासगी रुग्णलयाने केलेल्या चाचणीत या चिमुकलीला ह्यूमन मेटान्यूमोची लागण झाल्याचं दिसून आलं आहे. मात्र, सरकारद्वारे अद्याप कोणतीही चाचणी करण्यात आलेली नाही. यासंदर्भात बोलताना, खासगी रुग्णालयाच्या अहवालावर शंका उपस्थित करण्याचं कोणतंही कारण नाही, अशी प्रतिक्रिया आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने दिली आहे. दरम्यान महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ही यासंदर्भात एक परिपत्रक जारी केलं आहे. या परिपत्रकात विषाणूचा प्रसार रोखण्यासंदर्भात कोणती काळजी घ्यावी, याची माहिती देण्यात आली आहे.
सरकारने यासंदर्भात एक परिपत्रक जारी केलं आहे. या परिपत्रकात विषाणूचा प्रसार रोखण्यासंदर्भात कोणती काळजी घ्यावी, याची माहिती देण्यात आली आहे.