![](https://khandeshtimes.in/wp-content/uploads/2024/12/Jalgaon_Municipal_Corporation-780x470.jpg)
महापालिकेची कर वसुलीसाठी विशेष मोहीम ; 12 पथकांची नियुक्ती
जळगाव : शहरातील नागरिकांना वारंवार महानगरपालिकेकडून कर भरण्याचे आवाहन करून देखील जे नागरिक कर भरत नसल्यामुळे आता अशा थकबाकीदार नागरिकांचे नावे भर चौकात लावण्यात येणार असून कर वसुलीसाठी महानगरपालिकेने बारा पथकांची नियुक्ती केली असल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली आहे. नागरिकांनी थकीत कर भरावे असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
शहरात सुमारे १ लाख ३० हजार पेक्षा अधिक मालमत्ता आहेत, यातील बहुतांश मालमत्ता धारकांकडे 25 हजारापेक्षा जास्त थकबाकी आहे. तर काही थकबाकीदारांकडे तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधींचा कर थकित आहे. या मालमत्ताधारकांना नोटीस बजावून तसेच वारंवार आवाहन करून देखील ते थकबाकी भरत नसल्यामुळे आता त्यांच्या विरूध्द कडक कारवाई करण्याचा निर्णय मनपा ने घेतला आहे. महापालिकेच्या चार प्रभाग समिती कार्यालयाअंतर्गत ५० असे एकूण २०० मोठे कर थकबाकीदारांची यादी मनपाकडून तयार करण्यात आली असून आता त्यांचे नाव असलेली यादी बॅनरच्या माध्यमातून चौकाचौकात लावली जाणार आहे. शहरात चार प्रभाग समिती असून प्रत्येक प्रभाग समितीतील मालमत्ता कर वसुलीसाठी तीन असे एकूण १२ पथक नेमण्यात आले आहे. सुरूवातील नळ कनेक्शन कट केले जाणार आहे. नंतर दोन दिवसात थकबाकी न भरल्यास मालमत्ता जप्तीची कारवाई मनपाकडून केली जाणार आहे.
दरम्यान दोन महिन्यात तब्बल ३४८ थकबाकीधारकांचे नळ कनेक्शन कट करण्यात आले आहे.