धरणगाव I प्रतिनिधी सेंट्रल बँकेच्या एटीएममधून अज्ञात चोरटयांनी तीन बॅटर्या लंपास केल्याची घटना तालुक्यातील पिंप्री येथे उघडकीस आली असून याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, पिंप्री येथील सेंट्रल बँक शाखेतील एटीएमच्या मागील बाजूस तीन बॅटऱ्या ठेवलेल्या होत्या. १० जानेवारीला रात्री १ वाजेनंतर अज्ञात चोरट्यांनी या ३ बॅटऱ्या चोरुन पोबारा केला. २७ हजार रुपयांच्या बॅटरी चोरी केल्याबाबत धरणगाव पोलीस स्टेशनला सेंट्रल बँकेचे मॅनेजर रश्मी शामला यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.