जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक सहायता दूत प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन उद्या मंगळवार दि. १० ऑक्टोबर रोजी होणार आहे.
अधिसभा सभागृहात सकाळी १० वाजता उद्घाटन सोहळा प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे यांच्या हस्ते या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन होईल. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर हे प्रमुख अतिथी असतील. दि. १० ते १४ ऑक्टोबर अशा पाच दिवसांच्या या कालावधी १०० सहायता दूतांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये डॉ. विवेक काटदरे, डॉ.सौ. व्ही.व्ही. निफाडकर, डॉ. वीणा महाजन, हेमंत भिडे, डॉ. संदीप चौधरी, प्रा. अरूण पाटील, ॲङ महेश भोकरीकर, डॉ. कांचन नारखेडे, प्रा. सी.एस. पाटील, प्रा. शिवाजीराव अहिरराव, गिरीष कुलकर्णी, अनिता कांकरिया, प्रा.व.पू. होले, इंजि. राजेश पाटील, बारकू पाटील हे तज्ज्ञ पाच दिवसात प्रशिक्षण देणार आहेत. शनिवारी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकीत व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्या उपस्थित यांच्या उपस्थितीत समारोप होईल.
विविध महाविद्यालयांमधील शंभर विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्यासाठी या प्रशिक्षणाद्वारे तयार केले जाणार असल्याची माहिती संचालक प्रा. आशुतोष पाटील यांनी दिली.