खान्देशगुन्हेजळगांव

जळगावात जुगार अड्ड्यावर धाड ; २७ जुगारी अटकेत

जळगाव :सोशल क्लबच्या नावाखाली नावाखाली सुरू असलेल्या नेरीनाका परिसरातील मोठ्या जुगार अड्डयावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी छापा टाकला. अचानक पडलेल्या छाप्यामुळे जुगाऱ्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी याठिकाणाहून २७ जुगाऱ्यांना अटक करण्यात आली असून ६ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,शहरातील  नेरीनाका परिसरात सोशल क्लबच्या नावाखाली जुगाराचा अड्डा सुरु असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांना मिळाली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने सोमवारी सायंकाळच्या सुमारास नेरीनाका परिसरातील जुगार अड्ड्यावर छापा टाकला. याठिकाणाहून २७ जुगारींना ताब्यात घेत त्यांच्याकडून १ लाख ६७ हजारांची रोकड, १८ मोबाईल आणि ४ दुचाकी असा एकुण ६ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई

ही कारवाई स्था. गु. शाखेचे वरिष्ठ पो. नि. किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनााली सहा.पो.नि. निलेश राजपूत, पो.उ.नि. गणेश वाघमारे, पो.हे.कॉ. राजेश मेढे, महेश महाजन, किरण चौधरी, पो.ना. श्रीकृष्ण देशुख, भगवान पाटील, हरिश परदेशी यांच्या पथकाने केली.

हे २७ जुगारी अटकेत

सुनील गबा पाटील (वय ५०, रा. पाचोरा), संदीप रामा गोपाल (वय २८, रा. वावडदा), पंढरी बाबुराव कोळी (वय ३०, रा. भादली), जगदीश सोमनाथ हळवे (वय ३८, रा. जुने जळगाव), स्वप्निल शंकर हवलदार (वय ३३, रा. मेहरुण ), गजानन रतन चौधरीवय ५०, रा. तुकाराम वाडी), केशव एकनाथ भोळे (वय ६५, जुना खेडी रोड), नामदेव मानसिंग पाटील (वय ४८, रा. मन्यारखेडा), नंदकिशोर रतन चौधरी (वय ४३, रा. तुकाराम वाडी), धनंजय दिनेश कंडारे (वय २७, रा. शनिपेठ), नितीन भास्कर गायकवाड (वय ३९, रा. जुने जळगाव), , गणेश तुकाराम पाटील (वय ३६, रा. गुरुकुल कॉलनी), रवी कमलाकर बाविस्कर (वय ३६, रा. वाल्मीक नगर), आकाश प्रभाकर पाटील (वय ३०, रा. जुना खेडी रोड), पिंटू सुधाकर भोई (वय ३७, रा. टाळकी, ता. धरणगाव), इब्राहिम अकबर सय्यद (वय ६०, मासूमवाडी), इम्रान शेख सय्यद (वय ४४, रा. मासूमवाडी), मनोज रमेश शिनकर (वय ३०, रा. मारुती पेठ), चंद्रकांत शंकर पाटील (वय ६०, रा. मन्यारखेडा), रमेश पुंडलिक सोनार (वय ७१, गिरणा टाकी परिसर), मुकेश शांताराम पाटील (वय ४३, रा. रामेश्वर कॉलनी), भरत दिलीप बाविस्कर (वय ३८, रा. लक्ष्मी नगर), अरुण कौतिक चौधरी (वय ४७, रा. सुप्रीम कॉलनी), मयूर रामचंद्र कोल्हे (वय ३४, रा. विठ्ठल पेठ), दत्तू भिका सोनवणे (वय ६८, रा. कांचन नगर), नरेंद्र एकनाथ ठाकरे (वय ३३, रा. मेस्को माता नगर), सीताराम ज्योतीराम सोनवणे (वव ४०, रा. तुकाराम वाडी) यांना अटक केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button