एरंडोल ;- येथील एकाकडे राहिलेले ३० हजार रुपये मागितल्याचा राग आल्याने एकासह चार जणांनी मिळून एकाला लाकडी दांडाने बेदम मारहाण करून त्याच्याजवळील मोबाईल आणि ३० हजारांची रोकड लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , धुळे येथील व्यवसायाने ड्रायव्हर असलेले सुरेश अशोक कुलकर्णी वय ५५ यांना आरोपी किरण पंजू वाणी आणि इतर चौघांनी ११ रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास हायवेवरील हॉटेल केसरी गार्डन समोर ३० हजार रुपये मागितल्याचा रागातून लाकडी दांड्याने डोक्यात मापाठीवर डोळ्यावर मारहाण करून दोन मोबाईल आणि ३० हजारांची रोकड लांबविल्याची घटना घडली . याप्रकरणी ५ जणांविरुद्ध सुरेश कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पौनी शरद बगल करीत आहे.