जळगाव ;- ट्रकखाली झोपलेल्या क्लिनरचा अचानक चालकाने ट्रक सुरु केल्याने चाकाखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना एमआयडीसी परिसरातील
खांदेश फिलेरो कंपनी समोर आज १८ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली . दिपक विनोद मेढे, वय 32 वर्षे रा. फैजपुर ता यावल जि जळगाव असे मृत क्लिनरचे नाव आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , दिपक विनोद मेढे हा खांदेश फिलेरो जळगाव येथे गहु खाली करण्यासाठी आलेला 10 चाकी ट्रक एम एच 19 सी वाय 2017 हि दुपारी 12.10 वाजता पुढे जात असतांना ट्रकचे मागील चाका खाली येवुन त्याचा अपघात झाला अपघातात पोटाला, डोक्याला जबर दुखापत झालेली असुन तो सदर अपघातात मयत झाला आहे सदर ट्रक वर शेख मझहर शेख अख्तर रा. फैजपुर ता. यावल जि जळगाव हा असुन याने सदरची ट्रक बेदरकारपणे व हायगयीने चालवुन अपघात केला असुन अपघातास तोच जबाबदार आहे.अशी फिर्याद मयताच्या भाऊ आतिष मेढे याने दिल्यावरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
घटनेनन्तर काही वेळातच सहाय्यक फौजदार अतुल वंजारी पोलीस हवालदार संदीप सपकाळे सुधीर साळवे राहुल रगडे दत्तात्रय कांबळे असे रवाना होऊन मयत यास सरकारी हॉस्पिटल येथे दाखल केले होते व झालेल्या अपघाताची माहिती त्याच्या नातेवाईकांना दिली होती तसेच चालक याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले होते सदर बाबतीत वरप्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाटील करीत आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनमा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला. मयताच्या पश्चात आई, वडील, विवाहित बहीण, भाऊ असा परिवार आहे.