पारोळा – विषारी द्रव्य प्राशन करुन कर्जबाजारी शेतकरी दीपक बाबुलाल पाटील (वय ४२, रा. दळवेल) यांनी आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पारोळा तालुक्यातील दळवेल येथे दीपक पाटील हे वास्तव्यास आहे. त्यांनी शेतात कापूस व इतर वान लावलेले होते. कमी पावसाळा व शेतीमालाला भाव नसल्याने ते काही दिवसांपासून नैराश्यत होते. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून घेतलेली कर्ज कसे फिटणार या गोष्टीची नेहमी चिंता करत होते. त्यामुळे बुधवारी राहत्या घरात शेतात पिकांवर फवारणी करण्याचे विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली.
कुटुंबियांसह ग्रास्थांनी दीपक पाटील यांना तत्काळ रुग्णालय दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी करीत मयत घोषीत केले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी पारोळा पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.