भुसावळ ;- भुसावळच्या तरुणाची चार लाखांमध्ये एसटी महामंडळात क्लार्क पदावर नोकरी लावून देण्याचे अमिश दाखवून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून दोघांविरुद्ध बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी कि, म्हाडा कॉलनी वांजोळा रोड भुसावळ येथे राहणार अविनाश सुभाष तायडे वय २८ याला एसटी महामंडळात क्लार्क पदावर लावून देण्यासाठी संशयित आरोपी कोमल धनसिंग पाटील, रा. पोलीस नगर भुसावळ आणि प्रकाश पारधे रा. श्रीराम नगर ता. यावल या दोघांनी फिर्यादि कडून नोकरी लावून देतो म्हणून ८ मे २०२२ ते १७ ऑक्टोबर २०२२ दरम्यान वेळोवेळी ४ लाख ७ हजार रुपये घेऊन फिर्यादीचा विश्वास संपादन करण्याकरिता खोटे दस्तावेज तयार केले . मात्र आपली दोघांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने तरुणाने २९ जून रोजी सायंकाळी ६ वाजता बाजारपेठ पोलिसांत दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला . तपास पोहेकॉ गणेश चौधरी करीत आहे.