वरणगाव ;- शहरातील अक्सा नगर परिसरातील मोकळ्या जागेत लहान मुले खेळत असताना मागून येणाऱ्या चारचाकी गाडीने जोरदार धडक दिल्याने १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
या बाबत वृत असे की गुरुवार दि ८ रोजी सायकाळच्या सुमारास शहरातील अक्सा नगर परिसरातील रहिवाशी असलेला नुमान आशिक बेग ( १४ ) हा घराच्या शेजारीच असलेल्या मोकळ्या पटांगणावर त्याच्या मित्रा सोबत सायकल चालवत असतांना त्याच ठिकाणी चारचाकी मालवाहु (क्र एम एच ०४ इ एल ८३०२ )या गाडीचे दुरुस्तीचे काम सुरू होते. काम झाल्या नंतर गाडी चालवून पाहताना नुमानच्या सायकलीला चारचाकी गाडीने जोरदार धडक दिल्याने तो खाली कोसळल्याने त्याच्या डोक्याला जबर मार लागला . त्याला तात्काळ भुसावळ येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला . नुमान हा इ आठवीत शिककणारा चाटे स्कुलचा विद्यार्थी होता . त्याच्या दुर्दैवी अचानक जाण्यामुळे त्याच्या परिवारावर शोककळा पसरून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . या बाबत वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.