खान्देशगुन्हेजळगांव

चाळीसगावात लाखोंच्या दागिन्यांची भरदिवसा चोरी !

चाळीसगाव ;- शहरातील कोतकर कॉलेज जवळील आर डी टॉवर् जवळील एका घराचे कुलूप तोडून सुमारे ६ लाख २८ हजारांचे दागिने भरदिवसा चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार १८ रोजी दुपारी अडीच ते साडेतीन वाजेदरम्यान घडला असून दिवसाढवळ्या झालेल्या या मोठ्या चोरीमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी कि, नंदकिशोर रामेश्वर शर्मा( वय ६८ ) हे शेती व्यवसाय करीत असून त्यांचे आरडी टॉवर येथे घर असून १८ रोजी ते दुपारी अडीच वाजता चाळीसगांव शहरातील साजन कलेक्शन या ठिकाणी साड्या घेण्यासाठी गेले असता परत आल्यावर त्यांना दरवाजाला लावलेले कुलुप तोडलेले दिसून आले. तसेच आत जाऊन पाहिले असता कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागीने चोरुन नेल्याचा प्रकार लक्षात आला . यात त्यांनी फिर्याद दिल्यानुसार १,४४,०००/- रु. किमतीचा ग्रॅम सोन्याचा नेकलेस , ८८,००० रु. किमतीचा २२ ग्रॅम सोन्याचा नेकलेस, ६४,००० /- रु. किमतीचा १६ ग्रॅम सोन्याचा नेकलेस ,४०,०००/- रु. किमतीची १०३ सोन्याची चैन, ७२,०००/- रु. किमती १८ ग्रॅम सोन्याच्या ०३ अंगठ्या प्रत्येकी ०६ ग्रॅमच्या ,८०,०००/- रु. किमतीची २० सोन्याच्या २ पाटल्या (बांगड्या) , ८०हजार रु. किमतीची २० ग्रॅम सोन्याच्या बांगड्या , ४०,हजार रु. किमतीची १० ग्रॅम सोन्याच्या कानातले ०२ झुंबर , २० हजार रु. किमतीची ५ ग्रॅम सोन्याची बारीक चैन . असा एकूण ६ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरटयांनी लांबीला . याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.उप.निरीक्षक योगेश माळी करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button