खान्देशजळगांव

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संपन्न

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संपन्न

आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना स्थानिक स्तरावरच मिळणार मदतीसाठी मार्गदर्शन

जळगाव | प्रतिनिधी राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी तत्काळ मदतीचा हात मिळावा यासाठी जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष स्थापन करण्यात आले असून, त्याचे उद्घाटन महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडले.

उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, कक्षाचे जिल्हा प्रमुख डॉ. सिद्धार्थ चौधरी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्य शासनाने २२ फेब्रुवारी २०२५ रोजी या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निर्णय निर्गमित केला होता. त्यानंतर २३ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत जिल्हास्तरीय कक्ष त्वरित सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

पूर्वी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकांना सहाय्यता निधीसाठी मंत्रालयाचा ध्यास घ्यावा लागत असे. मात्र आता जिल्हास्तरावरच हे कक्ष सुरु झाल्याने अर्जाची प्रक्रिया अधिक सुलभ झाली असून, मार्गदर्शन, कागदपत्रांची पडताळणी आणि पाठपुरावा स्थानिक पातळीवरच शक्य होणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button